स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात यंत्रणांनी सक्रिय सहभाग वाढवावा

[ad_1]

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित  करण्यात यावेत. जिल्हा परिषद, समाज कल्याण, कृषी विभाग, आदिवासी विभाग यासह अन्य यंत्रणांनी  सक्रिय सहभाग वाढवावा. आझादी का अमृतमहोत्सवाबाबत देशात अनेक उपक्रम राबवत असतांना भंडारा जिल्ह्यानेही वैशिष्ट्यपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिले.

नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होत्या.

 शासन निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातील एका ऐतिहासिक शाळेचा विकास करावयाचा आहे. अशा शाळेची निवड करून त्याठिकाणी करावयाच्या कामांचे स्वरूप, अपेक्षित खर्च याविषयीची माहिती सर्व जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावी. तसेच हुतात्मा स्मारकांची डागडुजी, सुशोभीकरण करण्याची कार्यवाही 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. जिल्ह्यातील प्रमुख शासकीय इमारतींवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे बोधचिन्ह प्रदर्शित करावे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, तृतीयपंथीय यांच्यासाठी विशेष शिबिरे घेवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना संदीप कदम यांनी दिल्यात.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.