रस्त्याच्या डामरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे

[ad_1]

ग्रामीण भागातील रस्ते हे नागरिकांना मुख्यालयाला जोडण्याचे महत्वाचे माध्यम असून याकरिता रस्ते बांधकामांकरीता अनेक योजनांच्या माध्यमातून आवश्यक त्या निधीची पूर्तताही केली जाते.रस्त्यांअभावी अनेक गावे विकासापासून वंचित आहेत.

यासाठीच शासनाकडून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते.

मात्र अनेक ठिकाणी सबंधित यंत्रणेतील काही भ्रष्ट लोकसेवकांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नसून निकृष्ट कामे होत असल्याने ग्रामीण भागातील गावांची अपेक्षा पूर्ती होत नाही.

याचाच प्रत्यय पालांदूर ते पहाडी मार्गावर जिल्हा परीषद २५-१५ निधी अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या डांबरीकरणाच्या रस्ता कामात आला.

या डांबरीकरणाच्या रस्ता बांधकामात डांबर व ईतर तत्सम साहित्याचा अत्यल्प प्रमाणात वापर होत असून रस्ता बांधकामात वापरलेले साहित्य

निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रथमदर्शनी बघायला मिळत आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर(चौ.)पासून दोन किमी अंतरावर असलेल्या पहाडी गावाला मुख्य बाजारपेठ,शासकीय कार्यालय यांना जोडणारा एकमेव रस्ता आहे.

या रस्त्याचे मागील काही दिवसांपासून डांबरीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र काम सुरू असतानाच या मार्गाला अनेक खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावर गिठ्टी व दगडांचा थर हा कमी असल्याने साधे जड वाहन गेले तरी हा रस्ता उखडून निघत आहे.

या अश्याच निकृष्ट दर्जाच्या पायावर वरील आवरण टाकण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे हा रस्ता किती काळ टिकेल या संदर्भात गावकरी मात्र चिंतेत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.