धार्मिक असहिष्णुतेचे वातावरण रोखण्यासाठी सर्वधर्मीय समन्वय आवश्यक : नाना पटोले

[ad_1]

साकोली- धार्मिक भेदभाव न करता सर्व समाजातील बांधवांना एकजुटीने मानवीय दृष्टिकोन कायम ठेवून अहिंसेने जगण्याचा मार्ग संतांनी दाखविलेला आहे़. वर्तमान परिस्थितीत देशात धार्मिक असहिष्णुता व हिंसात्मक वातावरण तयार करण्यात येत आहे यावर सर्व समाज बांधवांनी जागरुकतेने विचार करावा संघटितरीत्या देशाची अखंडता कायम राखण्यासाठी सर्वधर्मीय बांधवांनी समन्वय ठेवावे असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व साकोली क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी केले. ते साकोली येथील संत हजरत बाबा भाईसाहब यांच्या  उर्स समारोह प्रसंगी बोलत होते

साकोली येथील दिनांक 16 मे व 17 मे रोजी आयोजित संत हजरत बाबा भाईसाहब यांच्या उर्स कार्यक्रमाप्रसंगी नाना पटोले यांनी कबरस्तान येथील 25 लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.

यावेळी हिंदू-मुस्लीम कोमी एकता समितीचे अध्यक्ष अश्विन नशिने,जामा मस्जिद कमिटीचे सदर शमीम अन्सारी,मदिना मस्जिद चे नईमअली,बिलाल भाई भुरा,सदू कापगते,किशोर पोगडे,किशोर चन्ने,उमेश कठाणे,फजील खान,फहिम कुरेशी,मुशीर खान,राशिद कुरेशी,मंदार खेडीकर,विनायक देशमुख,ओम गायकवाड,मनीष कापगते,देवानंद नशिने, उत्तम गोडसेलवार,रवी राऊत,छोटू राऊत,शोएब भुरा,विजय दुबे,प्रणित नशिने,अबूभाई अलान उपस्थित होते.

या दोन दिवसीय उर्स समारोह प्रसंगी कानपूर येथील ऑल इंडिया गरीब नवाज कौन्सिलचे मौलाना मोहम्मद हाशिम अशरफी यांनी समाज प्रबोधन( प्रवचन) केले .कुरानखानी कार्यक्रमासह शहरात भ्रमण करून शाही संदल काढण्यात आला.

हजरत भाईसाहब बाबा यांच्या दर्ग्यावर नाना पटोले व सर्व धर्मीय समाज बांधवांच्या उपस्थितीत शाही चादर चढविण्यात आली.

याप्रसंगी आम लंगर आयोजित केला होता.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.