भंडाऱ्यातील १५० वर्षे जुनी गरदेव यात्रा उत्साहात साजरी

[ad_1]

भंडारा जिल्ह्यातील व पुर्व विदर्भाच्या टोकावर असलेल्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाचा सिमेवर असलेल्या तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या आष्टी या गावात होळीच्या पाडव्याच्या दिवशी प्रसिद्ध असलेली वांगेगारीची गरदेव यात्रा उत्साहात पार पडली.या यात्रेनिमित्त संपूर्ण जिल्ह्यातील व लागून असलेल्या मध्यप्रदेशातील बहुसंख्य भाविक भक्तांची उपस्थिती होती.
महाशिवरात्रीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील भाविक भक्त नंदी घेऊन येथे येत असतात.अशाच यात्रेचे आयोजन मोहाडी तालुक्यातील करडी,तुमसर तालुक्यातील कवलेवाडा,पालांदुर,पवनी तालुक्यातील नेरला या गावांमध्येही करण्यात आले होते.धूलिवंदनच्या दिवशी हजारो लोक गरदेवसमोर नतमस्तक होत असतात.ही गरदेवची यात्रा काही ठिकाणी दिड दिवसाची असते.आष्टीचा यात्रेला मोठी यात्रा तर कवलेवाड्याच्या यात्रेला छोटी यात्रा म्हणतात. जे कुटुंब छोटा किंवा मोठा महादेवला गेले,ते कुटुंबीय त्यांच्या नंदीसह त्यांच्या कुटुंबासह गरदेवला हजेरी लावतात.गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाचा प्रादुर्भावामुळे यात्रा बंद असल्याने यावर्षी मात्र हजारो लोकांची झुंबड पाहयला मिळाली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.