दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबाचे मदतीला सरसावले अखेर पत्रकारच..

CRIME INDIA NEWS

DEC 19 -2023, 05:50 PM

साकोली : वयाच्या ८१ व्या वर्षांपर्यंत पत्रकारीता करीत ज्येष्ठ लेखणीतले तरबेज आणि दांडगा अनुभव असलेले साकोलीचे स्व. रमेश दुरूगकर यांचे ११ डिसेंबरला निधन झाले. व त्याचे वृत्तासोबत लेखही झळकले. यातच ज्येष्ठ पत्रकारांचा काय आदरासन्मान असतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे हेच पत्रकारितेचे कर्तव्य आहे हे दाखवून दिले आहे भंडारा व साकोली येथील पत्रकार संघांनी.
साकोली येथील मुंडीपार/सडक येथील स्व. रमेशराव दुरुगकर यांचे ९ दिवसांपूर्वी निधन झाले. कुटूंबातील दुःख सावरायचं असतांनाच पत्नी गं.भा. शालिनी रमेश दुरूगकर यांना भंडारा येथे उपचारासाठी डॉ. मनोज झंवर यांच्या रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना दि. १८ डिसें.ला सुट्टी देण्यात आली. रुग्णालयाचे बिल ३२ हजारावर झाले होते मात्र कुटूंबीयांकडे अपूरे पैसे असून आपण केलेली मदत व कुटुंबीयांकडे असलेले पैसे मिळून १५००० रुपये होते. यासाठी डॉक्टरांना सदर हे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या पत्नी असून भंडारा येथे असलेल्या पत्रकारांनी थोडी सवलत द्या अशी विनंती करण्यात आली. मात्र तेथे कुठलीच सवलत प्राप्त झाली नाही. यावरून असे पैशांच्या मोहात माणूसकी विसरणारे काही असतातच. सदर बाब भंडारा येथील पत्रकार नंदू परसावार, राकेश चेटूले, शमशेर खान, नाजिम पाशाभाई, सागर भांडारकर, दिपक फूलबांधे, व अन्य पत्रकारांनी दुरूगकर कुटुंबीयांकडे असलेल्या १५,००० रुपये व वरील पैसे स्वतः संकलित करून डॉ. झंवर रुग्णालयातील संपूर्ण बिलाचा भरणा केला. पत्रकारांच्या कुटुंबीय आर्थिक रित्या अडचणीत असतांना सर्व पत्रकारांनी सढळ हाताने माणुसकीचा आणि ख-या पत्रकारीतेचा यावेळी परीचय दिला. तसेच साकोली पत्रकार संघातर्फेही पत्रकारांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत म्हणून मुंडीपार येथे दि. १७ डिसेंबरला १० हजारांचा धनादेश साकोली पत्रकार मनिषा काशिवार, संतोष कोरे, प्रशांत शिवणकर यांकडून देण्यात आला.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ज्येष्ठ पत्रकारांना आदरासन्मान देत भंडारा जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ पत्रकार स्व. रमेशजी दुरूगकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहायता देत खरी पत्रकारीची परीभाषा अशीच असते हे पुण्य आणि गौरवास्पद कार्य भंडारा व साकोली पत्रकारांनी करून दाखविले आहे. मात्र दूसरीकडे काही पैशाची हाव असणारे वैद्यकीयांना ख-या लोकशाहीचा चौथा स्तंभाची व वयाच्या ८१ वर्षांपर्यंत जनसेवा करणा-या ज्येष्ठ पत्रकारांच्या कुटूंबीयांना सहानुभूतीची भावना दिसून आली नाही व पत्रकारीची खरी परीभाषा समजून आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.