भंडारा जिल्हात असा ही एक गाव ‘बंध विक्रीतून पडले ‘पालेपेंढरी’ गावचे नाव …शेकडो वर्षापासून गावात केली जाते बंध निर्मिती व विक्री…

CRIME INDIA NEWS

NOV 27 -2023, 05 :37 PM

लाखांदूर – लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले पालेपेंढरी हे जवळपास दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे.येथील बहुसंख्य नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मागील शेकडो वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून बंध निर्मिती करणे सुरू केले होते.बंध निर्मिती करण्यासाठी येथील शेतकरी आपल्या शेतात हलक्या व बारीक धानाची लागवड करतात.धान लवकर निघाल्याने त्याची कापणी करून घरी हातानेच त्याची मळणी केली जाते.धान वेगळी झालेली तणस पाण्यात भिजवली जाते.तणस पाण्याबाहेर काढून त्यापासून बंधाची निर्मिती केली जाते.बंध निर्मितीचा हा व्यवसाय खरीप हंगामाच्या सुमारास जवळपास २ महिने चालतो.या बंधाचा वापर खरीप व रब्बी हंगामातील धान बांधणीसाठी केला जातो.पालेपेंढरी या गावातील जवळपास सर्वच कुटुंब बंधन निर्मिती करून विक्री करीत असल्याने त्यांना यामधून स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे.जवळपास ४ नागरिक असलेले एक कुटुंब वर्षाकाठी या व्यवसायातून जवळपास ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.