लाखांदूर येथे बस ला मोटारसायकलची धडक,एकजण जखमी…..

CRIME INDIA NEWS

Aug 24 , 2023, 05 :07  PM

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरातील चौकातून वळण घेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मोटारसायकलने धडक दिल्याने मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील छत्रपती शिवाजी चौकात घडली.या दुर्घटनेत राहुल श्रीराम ढोरे वय २३वर्ष रा. चप्राड असे जखमीचे नाव आहे.राहुल हा लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात आपल्या नातेवाईकाला बाळ झाल्याने तो बघण्याकरिता आला होता . परत येताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी बस वळन घेत असताना दुचाकी क्रमांक mh 31 bz 7044 हे विरूद्ध दिशेने ग्रामीण रुग्णालयात जाण्याकरिता निघाली असता दुचाकीचा एसटी बसला धडक झाली या धडकेत राहुल हा जखमी झाला या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना होताच जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.