बार्बिक्स कंपनीच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष

CRIME INDIA NEWS

july 28, 2023, 02;40 PM

गोंदिया : गोंदिया शहरातील रिंग रोडवर रस्त्याचे काम सुरू असून पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक लोकांचा अपघात होतो. बालाघाट व गोंदिया कडून नागपूर तिरोडा कडे जायला हा मुख्य रस्ता असून दिवसभर शाळकरी मुलं, हॉस्पिटलमध्ये जाणारे लोकांची या रस्त्यावर वर्दळ असते, अशातच पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने समोरचा रस्ता दिसत नाही. परिणामी या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. मात्र याकडे संबंधित कंत्राटदार दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.