बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी सहकार नगर येथील घटना

CRIME INDIA NEWS

july 24, 2023, 12:00 PM

भंडारा : प्रवासी घेऊन यवतमाळ – तिरोडा ही बस भंडारा – तुमसर मार्गे तिरोडा येथे जात असतांना घराकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरसामोर धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना सहकारनगर – शास्त्री चौक घडली.प्रेमलाल जीवतू बडवाईक (५५) रा. गंगानगर (खोकरला) असे जखमीचे नाव आहे.
तिरोडा आगाराची एसटी बस क्र. एमएच ४० एन ८५९० ही प्रवाशी घेऊन भंडारा- तुमसर मार्गे तिरोडा येथे भंडारा बसस्थानकावरुन निघाली. सहकारनगर ते शास्त्री चौक या दरम्यान घराकडे जात असलेली मोटारसायकल क्र.एमएच ३६ एस १७६७ या दुचाकीला जबर धडक दिली.यात प्रेमलाल बडवाईक दुरवर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमीला उपचाराकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या अपघातात मोटारसायकलचा चेंदामेंदा झाली.अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.अपघाताची माहिती भंडारा पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोयर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.