आदर्श युवा मंच चा पुढाकाराने  शहरातील गणेशपूर नगरीत नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा

CRIME INDIA NEWS
AWAZ BHANDARA

भंडारा ;- आज दिनांक 25 डिसेंबर 2021 ला भंडारा शहरातील गणेशपूर येथे नाताळ हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे.ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात.ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा करण्यात येतो या दिवशी जिसस क्राइ्र्रस्ट म्हणजेच प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.
येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. येशुख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला.येशुंना देवाची एकमेव संतान मानले जाते.त्याकाळातील शासन कर्त्यांना येशुख्रिस्तांचा हा संदेश पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी येशु ख्रिस्तांना सुळावर लटकवले आणि मारून टाकले.त्यानंतर येशु ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात असे वक्तव्य समाजसेवक पवन मस्के तथा आदर्श युवा मंच जिल्हा भंडारा अध्यक्ष व संस्थापक यांनी उपस्थित लोकांना सांगितले. या प्रसंगी रमेश भोयर,संजू मते,विजय नागपुरे,लुकेश जोध,सौ.संगीता मस्के,सौ.विद्या सुखदेवे,रिता भोयर,श्रीमती.जया जोध,श्रीमती शोभा वलथेरे, सौ.निकिता मस्के,शीतल मस्के,सौ.स्नेहा रायपूरकर,चेतन जोध,किरण कावळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.