भटक्या विमुक्तांचे न्यायीक हक्कासाठी क्रांती आंदोलन. भटक्या विमुक्त संघर्ष वाहिनी तुमसर.

CRIME INDIA NEWS
AWAZ BHANDARA

सिहोरा :- तुमसर तालुक्यातील भटक्या विमुक्तांना मुलभूत हक्क व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, यासाठी भटक्या विमुक्तांचे संघर्ष वाहिनी तर्फे राज्यभर निवेदन देण्यात येत आहेत.
आज दिनांक २ अगस्त २०२१ तहसील कार्यालय तुमसर येथे संघर्ष वाहिनी तुमसर तर्फे निवेदन सादर करण्यात आले. यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या नागरिकांना कागदपत्रे मिळण्यासाठी संबंधित निवासस्थानी कॅम्प लावून सर्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. भटके विमुक्त जाती जमाती ह्या आपले बिऱ्हाड पाठीवर ठेऊन रोजगार व पोटाची खळगी भरण्यासाठी सतत भटकंती करीत असतात. त्यामुळे वयोवृद्ध पासून तर कोवळ्या बालकांपर्यंत कोणाचेच जन्म, मृत्यू, रहिवासी यांची नोंद होत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी ही सततची भटकंती होत असल्याने मिळेल तिथे राहणे, मिळेल ती जमीन कसने, हेच पिढ्यानपिढ्या होत आहे. मात्र, आज भटक्या विमुक्त जाती जमातीमधील मुले-मुली मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करीत आहे, घरकुल योजनेचा लाभ मिळावा या साठी प्रयत्न करीत आहे. मात्र नोंद नसल्याने कोणतेच कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने ही मंडळी त्रस्त आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील तालुक्यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्त्या आजही गावकुसाबाहेर आहे. यात प्रामुख्याने सरोदे, गोपाळ, बेलदार, भरवाड, पारधी, पांगुळ, वडार, लोहार, सिकलगर, नाथजोगी, गोसावी, बंजारा, धनगर, वंजारी, भोई, ओतारी, यासारख्या इतर अनेक जातींच्या वस्त्या आणि तांडा आहे. मात्र सरकारी योजना यांच्या पर्यंत पोहचतचं नाही. महाराष्ट्रभरात प्रशासनाने एकाच ठिकाणी एकाच वेळेस भटक्या विमुक्त जाती जमातींच्या नागरिकांना रहिवासी दाखला, राशनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, घराचे पट्टे, शेत जमिनीचे पट्टे, वनजमीन हक्क दावे निपटारा, निराधार, एकल महिलांना पेन्शन व प्रमाणपत्र योजना उपलब्ध करून देण्यात यावे. हे सर्व प्रमाणपत्र, हक्क व अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे.
वरील मागण्या संदर्भात तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी संघर्ष वाहिनी तुमसर तर्फे मनोहर राठोड, चंद्रकांत भट, भारत राठोड, चंद्रकात भट, अजय पवार, राजकुमार मोहनकर, कांचन अवथरे, राजेश उईके पंजाब राठोड, वेल्फेअर संघ दिल्ली शाखा महाराष्ट्र भंडारा जिल्हा अध्यक्षा सुनिता मोहनकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.